Thursday, August 11, 2022

नगर जिल्ह्यातील या दोन ठिकाणी पुन्हा निर्बंध

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे काल प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात 37 व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली दीड महिन्यातील ही नीचांकी रुग्णसंख्या आहे त्यामुळे तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनाने बुधवार व शनिवार दोन दिवस

जनता कर्फ्यू ऐवजी फक्त शनिवारी पारनेर तालुका व बुधवारी सुपा येथील सर्व व्यवहार बंद राहील अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.गेल्या दोन महिन्यापासून राज्यभर कोरोनाने थैमान घातले आहे तालुक्यातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढली मात्र आता रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे .

त्यामुळे तालुक्यात बुधवार व शनिवार दोन दिवस जनता कर्फ्यू चा निर्णय कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे तहसीलदार ज्योती देवरे तसेच व्यावसायिक व व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तालुक्यात फक्त आठवड्यातून शनिवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे या निर्णयाला सर्व व्यापारी व्यवसायिकांनी पाठिंबा दर्शवला

असल्याने शनिवारी जनता कर्फ्यू असणार आहे तसेच बुधवारी सुपा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तसेच सुपा येथे बुधवारी आठवडा बाजार भरला जात त्यामुळे येथे गर्दी होत आहे त्या अनुषंगाने बुधवारी सुपा पूर्ण बंद राहील असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे. राज्यात काही ठिकाणी निर्बंध खुले केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे त्यामुळे

पुन्हा रुग्ण संख्या वाढीचा धोका आहे तालुक्यात अनेक गावांमध्ये रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे काही गावे पूर्ण कोरोनामुक्त झाली आहे यापुढे तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने नागरिकांनी काळजी व खबरदारी घ्यावी निर्बंध खुले केले असले तरी कोरोना संदर्भातील नियमावलीचे पालन होणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!