Wednesday, August 17, 2022

अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले मतभेद समोर आले आहेत. याबाबत, काँग्रेसच्या मंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील

अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांच्यासमवेत काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांची बैठकही झाली. याच पदोन्नतीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्रीपदावरुन हटविण्याची चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. त्यावरुन, धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत, त्यांना हटविण्याची मोहीम राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून होत आहे, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता.

त्यावर, उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याचा घणाघाण गोपीचंद पडळकर यांनी केला. 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे, असे पडळकर यांनी म्हटलं.

पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे पुढे आली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत, भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत.

त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचं काम केलंय, हे सुस्पष्टपणे दिसतंय, असे प्रत्त्युत्तर पडळकर यानी दिलं आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!