Thursday, August 11, 2022

आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा;नाहीतर परिस्थिती पुन्हा एकदा बिघडू शकते

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील कोरोना प्रादुर्भावाची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. देशात सध्या जवळपास ९ लाख सक्रिय रुग्ण असून २० राज्यांमध्ये सध्या ५ हजाराहून कमी सक्रिय रुग्ण आहेत, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

यासोबत कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाख १७ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीमध्ये जवळपास ८५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण ३.२८ टक्के इतकं होतं.

तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ३.०५ टक्के इतकं आढळून आलं आहे. याशिवाय ११ ते २० वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण ८.०३ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ८.०५ इतकं आहे.देशातील प्रत्येक नागरिकानं मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या कोरोना संबंधिच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करतो, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. यासोबत लांबचा प्रवास टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला आहे.

नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटबाबत नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “कोरोना विषाणूचा नवा व्हेरिअंट २०२० सालच्या व्हेरिअंटपेक्षा खूप चलाख झाला आहे. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. नाहीतर परिस्थिती पुन्हा एकदा बिघडू शकते”, असा इशारा व्ही.के.पॉल यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!