Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसने तब्बल इतक्या रुग्णांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात २३९ जणांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने घेरले. कोरोनातून बरे होऊनही म्युकरमायकोसिसमुळे २० जणांना त्यांचे डोळे कायमचे गमवावे लागले आहेत. या बुरशीजन्य आजाराची सध्या जिल्ह्यात तीव्रता कमी झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या संख्येत अधिक वाढ झाली. अधिक काळ आयसीयूमध्ये उपचार घेणे, स्टेरॉईडचा वापर करणे, ऑक्सिजनच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडयुक्त औषधांचे सेवन करणे यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ झाली होती.

मधुमेह, तसेच इतर गंभीर आजार असलेल्या आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आजाराचा गंभीर धोका होता.जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १२३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या ९७ जणांवर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात इंजेक्शन आणि औषधांचा साठा उपलब्ध आहे.

-डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा साथरोग अधिकारी

ताज्या बातम्या

error: Content is protected !!