Wednesday, August 17, 2022

माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती कारखान्याच्या संचालकांवर गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळे आरोप हाेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.

अगस्ती साखर कारखाना संशयाच्या भोवऱ्यात अडकवून बंद पाडायचा आणि तो खासगी तत्त्वावर चालविण्यासाठी घ्यायचा, असा तथाकथित शेतकरी नेत्यांचा डाव असून, अकोलेकर जनता हे कदापि खपवून घेणार नाही. अगस्तीची बदनामी करून पत कमी करण्यापेक्षा हिम्मत असेल तर कारखाना ताब्यात घेऊन चालवून दाखवा, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, संचालक मंडळ कारखान्यावरील कर्ज फेडून कारखाना सक्षमपणे चालविण्यास समर्थ आहे. काही लाेकांनी कारखान्याची बदनामी सुरू केली आहे. अशी बदनाम करू नका? चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यावर कारवाई होईलच. कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उभारणी सुरू केली जाते; पण काही सभासद त्यात अडथळा आणून संस्थेबद्दल गैरसमज पसरवीत आहेत.

त्यामुळे तालुक्याची कामधेनू बंद पडण्याची शक्यता आहे. तेव्हा तालुक्यातील सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवणाऱ्यांनी कारखान्याचा अपप्रचार करू नये. विद्यमान संचालक मंडळ गावोगावी जाऊन कारखान्याची परिस्थिती सभासदांसमोर मांडणार आहे. अगस्तीची बदनामी करणाऱ्यांचे कारखाना उभारणीत योगदान काय, असा सवाल पिचड यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!