Thursday, August 11, 2022

आता चक्क ड्रोनद्वारे घरपोच मिळणार औषधं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: तुमच्या घरापर्यंत आता औषधांची डिलीव्हरी Drone ने होईल. याला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे.ट्रायल 18 जूनपासून बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. ज्या ड्रोनला यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, त्यांना म्हटलं जातं. जिथे या ड्रोनचा प्रयोग होणार आहे, ते बेंगळुरूपासून सुमारे 80 किलोमीटरवर आहे.

ज्या कंपन्या ही सर्विस देणार त्यात बेंगळुरूची थ्रोटल एयरोस्पेस सिस्टम (TAS) सामिल आहे, ज्याला DGCA कडून 20 मार्च 2020 मध्ये मंजुरी मिळाली आहे. या ड्रोन मेडिसिन सर्विसची सुरुवात आधीच झाली असती, परंतु कोरोनामुळे याचं ट्रायल थांबवण्यात आलं होतं. TAS ला मंजुरी मिळाली असून हे ट्रायल 18 जूनपासून सुरू होणार असून 30-45 दिवसांपर्यंत चालेल.

या ड्रोन ट्रायलसोबत इतरही काही संघ सामिल असणार आहेत. TAS शिवाय Narayana Health देखील यात पार्टनर आहे, जे ट्रायलदरम्यान औषधं उपलब्ध करुन देणार आहेत. तसंच इनवोली-स्विस जे प्रोफेशनल ड्रोन अॅप्लिकेशनसाठी एअर ट्रॅफिक अवेयरनेस सिस्टम स्पेशलिस्ट आहेत, तेदेखील यात सामिल असणार आहे.

हनीवेल एयरोस्पेस एक सेफ्टी एक्सपर्ट म्हणून यात काम पाहणार आहे.या ट्रायलमध्ये दोन प्रकारच्या ड्रोनचा वापर होणार आहे. यात MedCOPTER आणि TAS सामिल आहे.TAS चे सीईओ नागेंद्रन कंडासामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, MedCOPTER चं छोटं वेरिएंट एक किलोग्रॅम वजन 15 किमीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. तर दुसरं 2 किलो वजन 12 किमीपर्यंत घेऊन जाऊ शकतं.

या दोघांची टेस्टिंग 30-45 दिवसांपर्यंत होणार असून DGCA च्या आदेशानुसार 100 किलोमीटरपर्यंत उड्डाण करेल. ट्रायल झाल्यानंतर याच्या रिव्ह्यूसाठी ते अथॉरिटिजकडे सोपवलं जाईल.धोक्यांचा समावेश त्यांच्या यादीत केलेला नाही. त्यामुळे अद्याप तरी या प्रवासात मृत्यू झाल्यास त्यातून नुकसानभरपाई दिली जाणार नाही, असं एका इन्शुरन्स फर्मच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितलं.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!