Wednesday, August 17, 2022

यांच्या मुळे मी आमदार झालो लहू कानडेंनी सांगितले राजकीय गुपित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला तालुक्यातील उंबरगाव ते अशोकनगर व भैरवनाथ मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे आज आमदार लहू कानडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, सरचिटणीस अंकुश कानडे, पंचायत समिती सदस्य डॉ. वंदना मुरकुटे, उपाध्यक्ष कार्लस साठे, सचिव ऍड. समीन बागवान, विष्णुपंत खंडागळे, विलास शेजुळ, सोमनाथ पाबले, सतीश बोर्डे, सुरेश पवार उपस्थित होते.

यानिमित्ताने भैरवनाथ मंदिर विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने आमदार कानडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सर्वांना सोबत घेऊन जाणारी काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळेच भेदभाव न करता गरजेनुसार विकास कामे मंजूर होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या आशीर्वादाने आपण लोकप्रतिनिधी झालो.

म्हणून सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बांधील आहोत, असे सांगत आमदार लहू कानडे यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला. कानडे हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शिवसेनेत कार्यरत होते. आपण पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचे असल्याचे ते सांगतात. शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे. आपणदेखील भुमिपूत्र आहोत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्‍न सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे. तालुक्यात मंजूर झालेली विकासकामे आता दर्जेदार व टिकाऊ होण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे. सर्वांच्या सहभागाने तालुक्याचा विकास करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!