माय महाराष्ट्र न्यूज: प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी करत बुधवारी (दि. १६) गंगामाई घाट परिसरात नदीपात्रात झोपून अनोखे आंदोलन केले.
कासारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रं-दिवस अवैधरित्या वाळू उपसली जाते आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. येथून वाळू उपसा बंद होण्याची आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. वाळू उपसा न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आज सकाळी आठच्या सुमारास शहरातील व्यापारी व पर्यावरणप्रेमींसह अनेक नागरिकांनी वाळू तस्करांविरोधात नदीपात्रातील वाळूच्या खड्ड्याजवळ झोपून आंदोलन करीत या प्रश्नाकडे प्रशासन व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले.महसूलमंत्र्यांच्या मतदार संघात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करील.
अशा अपेक्षेत आजवर वाट पाहणाऱ्या संगमनेरातील पर्यावरणप्रेमींची सातत्याने निराशाच होत असल्याने, अखेर आज त्यांच्या संयमाचा बांध तुटला. शहरासह उपनगरात सुरु असलेल्या लहान मोठ्या असंख्य बांधकामासाठी वाळू येते कोठून हा सर्वसामान्यांना सतावणारा प्रश्न प्रशासकिय अधिकारी व महसूल विभागाला कधीच पडत नाही.