Thursday, August 11, 2022

महाराष्ट्रातून तीन जणांना मिळणार केंद्रीय मंत्री पद ;हे तीन नव्या हे चर्चेत?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मागील काही दिवसांपासून

भाजपा नेत्यांच्या बैठकी घेत असल्याने केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश निवडणूकीबरोबरच महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रीमंडळामध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो.

तर राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी दिल्लीला गेले असून राणे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राणे हे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नारायण राणे हे सध्या महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी आणि त्यातही खास करुन शिवसेनेचे सर्वात मोठे विरोधक मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन सुरु आहे. याच विषयावरुन राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसलेंना भाजपा केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये संधी देण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असतानाच उदयनराजे आणि नारायण राणे या दोन मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सहभागी करुन घेतले जाऊ शकते.

नारायण राणेंप्रमाणे आणखीन एक नाव केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे ते म्हणजे बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असणाऱ्या प्रितम मुंडे या २०१४ साली मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच खासदार झालेल्या. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्येही त्यांचा विजय झाला.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!