Wednesday, August 17, 2022

बालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे महिला व बालअपराध प्रतिबंध विभागाचे आदेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोविड-१९ मुळे आई वडील व पालक मृत पावलेल्या बालकांच्या दत्तक देण्याच्या बाबत अवैधरित्या, बेकायदेशीरपणे अशा जाहिराती समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिदध केल्या जात आहेत.

अशा बातम्या प्रसारित करणे अथवा समाजमाध्यमांद्वारे त्याची प्रसिद्धी करणे बाल हक्क संरक्षण कायदा २०१५ च्या विरोधी आहे. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहिराती देणार्‍या आणि अशी अवैध कामे करणार्‍या विरोधात गुन्हे नोंदविण्यासंदर्भात महिला व बालअपराध प्रतिबंध

विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना निर्देश दिले आहेत. तरी त्या अनुषंगाने अशा दिशाभूल करणारांची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागास कळवावी, असे आवाहन संबंधित शाखेच्या  प्रभारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोविड केंद्रामध्ये असलेल्या महिलांचे संरक्षण, तसेच कोरोनाने आई वडिलांचे निधन झाले आहे. अशा बालकांच्या हक्कांचे संरक्षण व अशा बालकांना बेकायदेशीर प्रकारे दत्तक देण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!