Wednesday, August 17, 2022

AIIMSच्या डॉक्टरांचा दावा:कोरोना रुप बदलून बनलाय ‘डेल्टा प्लस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं सर्वांची झोप उडवली आहे. कोरोनाच्या विषाणूनं आता रुप बदललं असून या नव्या व्हेरिअंटचं नाव आहे ‘डेल्टा प्लस’.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. अमरिंदर सिंग मल्ली यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट आता म्यूटेट होऊन डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे. याआधी भारतात जेव्हा सिंगल व्हेरिअंट आढळून आला होता तेव्हा तो आधीच्या विषाणूपेक्षा दुप्पट वेगानं पसरत असल्याचं दिसून आलं होतं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्डा व्हेरिअंटनं सर्वांना बाधित केलं. पण आता डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या बाबतीत जीनोम सिक्वेसिंगकडून ज्यापद्धतीचा अहवाल आला आहे ते पाहता आता कोरोना संक्रमणाचा दर आता आणखी वेगानं वाढू शकतो, असं अमरिंदर सिंग मल्ली म्हणाले.

इतकंच नव्हे, तर डेल्टा प्लस व्हेरिअंटच्याबाबतीत सुरुवातीच्या दाव्यांमध्ये असंही सांगितलं जात आहे की या व्हेरिअंटवर बहुतेक औषधं कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांसाठी डेल्टा प्लस व्हेरिअंट चिंतेचा विषय बनला आहे.

दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिअंचा प्रतिकार करण्यासाठी जगातील काही लस निर्मात्या कंपन्यांनी त्यांची लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. तर भारताच्या दोन लसींचा डेल्ट प्लस व्हेरिअंटवरील प्रभावाबाबत संशोधन अद्याप सुरू आहे. भारतीय लस डेल्टा प्लस व्हेरिअंटवर प्रभावी आहे किंवा नाही याची तपासणी सध्या केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!