माय महाराष्ट्र न्यूज:शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत.
त्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.इलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.
राज्यातील कोव्हीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयाच्या वर नमूद क्रमांक (४) येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता.
त्यानुसार राज्यातील कोव्हीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे, तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेची बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा 2020 चे आयोजन न करण्याबाबतचा शासन निर्णय वर नमूद क्रमांक 6 नुसार दिनांक 26 मार्च, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 12 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 28 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) साठी मूल्यमापन करताना शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार .
असलेल्या अन्य गुणंचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनामुळे इंटरमिजिएट ड्राईंक ग्रेड परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्यानं 2020-2021 यै शैक्षणिक वर्षासाठी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.