Wednesday, August 17, 2022

राज्यातील कोरोनाच्या मृत्यु संख्येत अचानक मोठी वाढ ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात कोरोना  बाधित रुग्ण आणि मृतकांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. भाजपच्या या आरोपानंतर आता राज्यातील कोविड मृतकांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात गेल्या दहा दिवसांत तब्बल 15 हजार जुन्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खरोखरच मृत्यू लपवले होते का? असा प्रश्न विचारला जात आहे.पोर्टलमध्ये आज राज्यात आज एक हजार मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे सर्व मृत्यू काही आठवड्यापूर्वी झाले आहेत. गेल्या 10 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येते की दररोज साधारणत: दीड हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि हे सर्व मृत्यू काही दिवसांपूर्वी झाली होती.राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, 237 मृत्यूंपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 999 ने वाढली आहे. हे 999 मृत्यू, नाशिक-240, पुणे-135, अहमदनगर-129, नागपूर-94, सातारा-81, ठाणे-49, सांगली-28, लातूर-24, जळगाव-23, बीड-22, कोल्हापूर-22, रत्नागिरी-19, नांदेड-17, परभणी-15, औरंगाबाद-14, भंडारा-14, हिंगोली-11, अकोला-9, बुलढाणा-8, पालघर-8, रायगड-8, वाशिम-8, चंद्रपूर-7, उस्मानाबाद-6, नंदूरबार-3, वर्धा-2, गडचिरोली-1, जालना-1 आणि यवतमाळ-1 असे आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 115390 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात नवीन 237 मृत्यूंची नोंद झाली आहे. 237 मृत्यूंपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!