Wednesday, August 17, 2022

असा केला नगर जिल्ह्यातील त्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार अन् पुढे झाले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर कांगोणी फाटा परिसरात दोन जणांनी गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. गोळीबारात चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी, की मंगळवारी (ता. १५) रात्री साडेनऊ वाजता चव्हाण हे काम आटोपून घोडेगावातून घरी जात होते. ते कांगोणी फाट्यापासून काही अंतरावर थांबले असता, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या खांदा, पाठ व कमरेखाली लागल्याने चव्हाण गंभीर जखमी झाले.

गोळीबाराचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जखमी चव्हाण एका चरात पडलेले होते. त्यांनी चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. भानुदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी संकेत चव्हाण व आरोपी चांगले मित्र होते. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात ते एकत्र सक्रिय होते. आरोपी हापसे व भारशंकर पूर्वी शनिशिंगणापुरात
पूजासाहित्य विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र असे काय घडले, की त्यांनी मित्रावरच गोळीबार केला, याचा शोध पोलिस घेत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!