Monday, May 27, 2024

अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाचा सगल चौथ्या वर्षी १०० टक्के पाणीपट्टी वसुलीचा विक्रम

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

अहमदनगर जलसंपदा विभागाचे  मुळा पाटबंधारे विभागाने ३१ मार्च २०२४ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली करून पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात वसुलीचे ११७५.३९ लाख रुपये उद्दिष्ट असताना ही १५४५.५७ लाख रुपयांची (१३१.४९ टक्के) वसुली केल्याची माहिती कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील यांनी दिली.

अधिक माहिती देताना कु. पाटील यांनी सांगितले की, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर या विभागाने आतापर्यंतची सर्वात जास्त व विक्रमी सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली करून पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी विभागातील प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे. त्यामुळे आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करू शकलो. मागील दोन वर्षांपासून सातत्याने विक्रमी पाणीपट्टी वसुली करीत आहोत. सलग ४थ्या वर्षी आपण १०० टक्क्यांपेक्षा जास्त वसुली करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व उपविभागीय अभियंता, अधिकारी, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी, विभागीय कार्यालयातील आणि उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचे आभार. तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता व प्रशासक तसेच वसूली कामी सहकार्य करणाऱ्या सर्व सिंचन व बिगर सिंचन संस्था आणि लाभधारकांचेही मनःपूर्वक आभार भविष्यात देखील सर्वांकडून पुनश्च कामगिरी होईल, अशी खात्री असल्याचेही पाटील म्हणाल्या.
————————————————
आर्थिक वर्ष–उद्दिष्ट (रु. लक्ष)–प्रत्यक्ष साध्य उद्दिष्ट(रु.लक्ष) –टक्के
————————————————–
२०२०-२१–७०८.९६–८७९.६१–१२४%
२०२१-२२–९११.३७–९६९.४३–१०६%
२०२२-२३–१०९०.६०–१२१५.३०–११४% २.
२०२३-२४–११७५.३९–१५४५.५७–१३१.४९%
————————————————–

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!