Monday, May 27, 2024

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका; महाराष्ट्रात वीज महागली, प्रति युनिट किती रुपयांची वाढ?

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे महावितरणने वीजदरवाढ करत सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. सरासरी साडेसात टक्क्यांनी वीजदरवाढ झाली आहे.

यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर सुमारे 10 टक्के दरवाढ होण्याचा अंदाज आहे. नवे दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यापासून वीजबिलात किमान

पन्नास रुपयांची वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगानं गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आकर्षक

आश्वासनं दिली जात आहे. एकीकडे भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपला लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकींच्या तोंडावर विद्यमान सरकारकडून मोठमोठ्या घोषणांची अपेक्षा

असतानाच जनतेच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं (MERC) नवे वीज दर निश्चित केले आहेत. जे नवे दर समोर आले आहेत, त्यात पूर्वीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, या वाढीमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांवर परिणाम होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या वातावरणात महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं (MERC) 1 एप्रिल 2024 पासून विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ केली आहे. एमईआरसीनं जारी केलेल्या नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, ज्यात

पूर्वी नागरिकांना 0 ते 100 युनिटसाठी 5.58 रुपये प्रति युनिट दरानं बिल भरावं लागत होतं, आता त्यांना प्रति युनिट 5.88 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच, आता ग्राहकांना तुम्ही प्रति युनिट 30 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!