Monday, May 27, 2024

नागरीकांनो देशात तीव्र उष्णतेची लाट येणार, IMD कडून महत्वाचे अपडेट: आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात निवडणूक प्रचार जोरात सुरु झाला आहे. त्याचवेळी मार्च महिन्यातील उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. निवडणुकीच्या प्रचाराच ज्वर जसजसा वाढणार आहे, तसतसा उन्हाचा पारा वाढणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदा महाराष्ट्रास देशातील सहा राज्यांमध्ये अधिक तापमान असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे. यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तापमान जास्त राहणार आहे. तसेच यावर्षी तीन महिन्यांतील 20 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील तीन महिन्यांत देशातील सहा राज्यांमध्ये तापमान अधिक राहणार आहेत. त्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात तापमान 2 ते 5 अंशांनी वाढू शकते.

एप्रिल-जून दरम्यान भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मैदानी भागांमध्ये उष्णतेची लाट सामान्यपेक्षा जास्त असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.महाराष्ट्रात १९ आणि २६ एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात

मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. पाचवा

टप्पा २० मे रोजी उत्तर महाराष्ट्र मुंबईत आहे. या भागांत निवडणुकी दरम्यान सरासरीपेक्षा जास्त तापमान असणार आहे.देशात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्य

विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असे केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!