Monday, May 27, 2024

नवोदय परीक्षेत तक्षशिला शाळेचे यश

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा राहुल कोळसे:2023-24 मध्ये पार पडलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये नेवासा तालुक्यातील देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा देडगाव मध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असलेला

विद्यार्थी आदित्य प्रदीप पवार याने घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षी या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात परंतु निवडीचे प्रमाण अत्यंत अल्प असते. आदित्यच्या या निवडीबद्दल तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या

वतीने त्याचा सत्कार करण्यात आला तसेच भविष्यातील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ .विजय कदम गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड संचालिका शुभांगी कदम, संस्थेच्या कॉर्डिनेटर कल्पना पवार, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, वर्ग शिक्षिका मोहिनी कर्डिले यांनी आदित्यचे विशेष अभिनंदन केले.

त्याच्या या यशाकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी व त्याचे आई-वडील यांनी परिश्रम घेतले. जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाल्याबद्दल परिसरातील पालक ग्रामस्थ व शिक्षक यांचे कडून आदित्य पवार चे व तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षक वृद्धांचे कौतुक होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!