Sunday, May 5, 2024

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हे, जयंत पाटील नगर जिल्ह्यातील या नेत्यासह ४० दिग्गजांचा समावेश

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार

प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या

स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे,सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar Party) लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर झाली आहे.

यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्या आणखी काही नेत्यांची नावे या यादीत आहेत. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही नावांची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाच्या

उमेदवारांच्या पहिल्या यादीच्या प्रतिक्षेत होता. यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपआपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!