Monday, May 27, 2024

आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल, ‘या’ सामन्याच्या तारखा बदलल्या, वाचा कारण

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आयपीएलच्या पहिल्या हंगामाला आता रंगतदार सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात रोमांचक सामना पहायला मिळत असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता आयपीएलच्या मध्यातच बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय

घेत आयपीएलच्या टाईमटेबलमध्ये (IPL 2024 TimeTable) बदल केला आहे. बीसीसीआयने 2 एप्रिलला मोठा निर्णय घेत, आयपीएलमध्ये होणाऱ्या दोन मॅचेसच्या शेड्यूलमध्ये बदल केला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टाययन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांवर या नवीन शेड्यूलचा फरक पडणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोघं संघांमध्ये कोलकत्याच्या ईडन गार्डनवर 17 एप्रिलला सामना होणार होता, पण हा सामना आता 16 एप्रिलला खेळवला जाणार आहे आणि गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 16 एप्रिलला होणारा सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 17 एप्रिलला खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2024 ची सुरूवात 22 मार्चला चेन्नईविरूद्ध बंगळूरूच्या मॅचने झाली होती. साऱ्या मॅच ठरलेल्या शेड्युलने होत असतानाच बीसीसीआयने आयपीएलच्या मध्येच शेड्यूलमध्ये थोडा बदलाव केला आहे. सुरक्षाच्या कारणामूळे आयपीएलच्या शेड्यूलमध्ये बदल करण्यात आला आहे, असं बीसीसीआय

अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 17 एप्रिलला रामनवमी असल्यामूळे कोलकाता आणि राजस्थानच्या होणाऱ्या मॅचसाठी कोलकत्ता पोलिसांनी सुरक्षा प्रदान करण्यासाठी नकार दिलाय, यामुळे कोलकाता प्रशासनाने बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्या दिवसाची मॅच नंतरच्या दिवशी

आयोजित करण्यासाठी विनंती केली होती. बीसीसीआयने या विनंतीचा आदर करत केकेआर आणि आरआर यांच्यातील होणाऱ्या लढतीला 16 एप्रिलला करण्याचा निर्णय घेतलाय, आणि 16 एप्रिलला होणारा दिल्ली आणि गुजरात यांच्या सामन्याला 17 एप्रिलला शिफ्ट केलं आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!