Sunday, May 5, 2024

सुजय विखेंचं निलेश लंकेंना ओपन चॅलेन्ज

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अहमदनगर येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. विद्यमान खासदार आणि महायुतीचे

उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना ओपन चॅलेन्ज दिलं आहे.मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान

सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते.या मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंके यांनी हे आव्हान दिलं आहे. महिनाभरात

जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असं सुजय विखेंनी म्हटले आहे. त्यामुळे आता सुजय विखेंचं हे चॅलेन्ज निलेश लंके स्वीकारतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस

पार्टी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये महायुतीचे विखे विरुद्ध महाविकास आघाडीचे लंक यांच्यात सामना रंगणार आहे. सुजय विखे पाटील यांचा विधानावर निलेश लंके यांचे समर्थक सोशल मीडियात प्रतिक्रिया देत आहेत. निलेश लंकेंना आयत काही

मिळालं नाही, त्यांनी संघर्ष केला. कोणत्या इंग्रजी शाळेत शिकले नाहीत, असे म्हणत कार्यकर्ते सुजय विखेंवर टीका करत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!