Monday, May 27, 2024

सरकार ‘या’ देशात करणार 10 हजार टन कांद्याची निर्यात

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) सातत्यानं घसरण होत आहे. तसेच सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) देखील आहे. त्यामुळं दर घसरत

असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात सरकारनं संयुक्त यूएईला म्हणजेच संयुक्त अरब अमीरातीला अतिरिक्त 10000 टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतलाय. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) याबाबतचे आदेश जारी केलेत. दरम्यान, या निर्णयाचा शेतकऱ्यांना

किती फायदा होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली होती. ही बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्चनंतर देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम आहे. मात्र, मित्र देशांना

काही प्रमाणात कांद्याच्या निर्यात केली जात असल्याचे दिसत आहे. संयुक्त अरब अमीरातीला 10000 टन कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलीय. दरम्यान, मित्र देशांना आत्तापर्यंत सरकारनं 79,150 टन कांद्याची निर्यात केलीय. दरम्यान, या कांदा निर्यातीमुळं दरात वाढ होईल का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,कांद्याची निर्यात ही मर्यादीत आहे, त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यंना फारसा फायदा होणार नल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. मात्र, निर्यातबंदीमुळं दराच घसरण झालीय. आता काही प्रमाणात निर्यात करण्यात येणार आहे,

मात्र ती देखील मर्यादीत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना याचा फार काही फायदा होईल असं वाटत नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!