Monday, May 27, 2024

सदाशिव लोखंडेंच्या प्रचारात कट्टर विरोधक आले एकत्र; जिल्ह्यात मोठी चर्चा 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज महायुतीचा मेळावा शिर्डी लोकसभा

मतदारसंघातील अकोले शहरात पार पडला. या मेळाव्याला कट्टर विरोधक आमदार लहामटे व पिचड पिता पुत्र हे प्रथमच एका मंचावर एकत्र आले.मंत्री दादा भुसे , उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा पार पडला. ही निवडणूक पिचड यांची किंवा

लहामटे त्यांची नसून मोदींची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र या व लोखंडे यांना विजयी करा, असे आवाहन ज्यष्ठ नेते मधुकर पिचड यांनी भाषणातून केले. मधुकर पिचड म्हणाले की, मोदी साहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. शिव्या शाप देणाऱ्या लोकांना या निवडणुकीपासून दूर न्यायचे आहे.

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर बसवण्याचे काम सुद्धा मोदींनी केलं. विखे पाटील तुम्ही बिंदास जा. आम्ही आपापसात लढणारे आता एकत्र आलो आहोत. ही निवडणूक माझी नाही माझ्या मुलाची नाही किंवा आमदार लहामटे यांची ही नाही. ही निवडणूक मोदींची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मंत्री दादा भुसे म्हणाले की,

शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा खासदार होणार आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. शिर्डीचा खासदार निवडून आला पाहिजे. दुष्काळी भागाला जास्तीत जास्त पाणी कसे उपलब्ध करून देता येईल यावर काम करावं लागेल. घराघरापर्यंत धनुष्यबाण आपण पोहचवावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी सदाशिव लोखंडे यांना पुन्हा निवडून द्या. मानपान, गट-तट बाजूला ठेवण्याची गरज आहे. 400 खासदारांमध्ये शिर्डीचा खासदार असला पाहिजे. मधुकरराव पिचड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा मी राष्ट्रवादी युवकाचा प्रदेशाध्यक्ष होतो. पहिले

भाजपचा मफलर आला, नंतर शिवसेनेचा मफलर आला, नंतर राष्ट्रवादीचा मफलर आला. कार्यकर्त्यांनी असेच एकजुटीने काम करावे. एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाची अवस्था काय केली हे आपण पाहिलेच आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी सर्व असंतुष्ट लोक एकत्र आलेत. ज्यांना उमेदवार मिळत नाही त्यांना

लोक मतदान करणार नाहीत. स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना लोक बाजूला करतील, असे त्यांनी यावेळी म्हटले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!