Monday, May 27, 2024

आता बँकेत जाण्याची कटकट मिटणार! UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: आपल्या हातातील मोबाईलच्या माध्यामातून आपण बरेच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. बँकेत जाण्याची आता बऱ्याचदा गरज भासत नाही. यूपीआयच्या सुविधेमुळे तर पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले आहेत. दरम्यान, याच यूपीआयच्या (UPI) मदतीने आता बँकेत न जाता तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे टाकता येणार आहेत.

बँकेत किंवा एटीएमच्या बाजूलाच आता सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) उपलब्ध आहेत. या सीडीएमद्वारे आपण प्रत्यक्ष बँकेत न जाताही आपल्या खात्यात पैसे टाकू शकतो. त्यासाठी आपल्याकडे डेबिट कार्ड असणे गरजेचे असते. आता मात्र सोबत डेबिट कार्ड (Debit Card) नसले तरीही सीडीएमच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा (Cash Deposit In Bank) करता येणार आहेत.

यूपीआयद्वारे सीडीएममध्ये पैसे कसे जमा करायचे? याची निश्चित पद्धत समोर आलेली नाही. खरं म्हणेज ही सुविधा सध्या चालू नाहीये. पण आगामी काळात लवकरच ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर सीडीएम मशीन्सवर यूपीआयचा ऑप्शन दिला जाणार आहे. आरबीआयने ही पद्धत लागू करण्यासाठी काम चालू केलेले असून लवकरच ते प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाईल. याच यूपीआयच्या मदतीने पैसे जमा करण्याची संभाव्य पद्धत जाणून घेऊ या…

आपला मोबाईल फोन घेऊन कॅश डिपॉझिट मशीनजवळ जा.या मशीनच्या स्क्रीनवर असलेल्या यूपीआय कॅश डिपॉझिट ऑप्शनवर क्लीक करावे. ज्या बँक खात्यात पैसे जमा करायचे आहेत, तो खाते क्रमांक टाकावा.बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल.

त्यानंतर तुमच्याजवळ असलेले यूपीआय अॅप उघडा आणि क्यूआर कोड स्कॅन करा.सीडीएम मशीनमध्ये पैसे टाका आणि पैसे जमा करण्याची अनुमती द्या.त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तसा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. दरम्यान, आरबीआयने यूपीआयद्वारे बँकेत पैसे कसे जमा करावे,

याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. अद्याप ही कार्यप्रणाली सुरू झालेली नाही. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!