Monday, May 27, 2024

विखेंनी माझ्या उमेदवारीला विरोध केला, या मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माझ्या शांत स्वभावाचा फायदा विरोधी पक्षातील नेते घेतच असतात. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद पहायला मिळाले. मलाही वाद घालता आला असता. मात्र मी जुळवून घेत वाद घातला नाही, असं वक्तव्य

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. जागावाटपासंदर्भातही रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुम्हाला जागा का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटलांवर थेट आरोप केला आहे. विखे पाटलांनी लिहिलेल्या पत्रात आरपीआय पक्षाला जागा देऊ नका असं त्यांनी म्हंटलं होतं, असं वक्तव्य करत आठवलेंनी मोठा गौप्यस्फोट केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज ”महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे २.०” या कार्यक्रमात संवाद साधला. या चर्चेत त्यांनी लोकसभा निवडणूक, जागावाटप, महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती अशा विषयांवर त्यांनी दिलखुलास

शैलीत उत्तरे दिली आहेत. यावेळी शिर्डीच्या जागेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या जागेबाबत सांगताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे दाखले देऊन भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी द्यावी,

याच्या सूचना भाजप नेतृत्वाने केल्या. जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी असाच निकष ठेवण्यात आला. हेच लक्षात घेऊन रामदास आठवले प्रबळ उमेदवार नसल्याचे कारण पुढे करून शिर्डीतील विखे पाटील यांनी आठवले यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करून त्यांना जागा देऊ नये, अशी भूमिका फडणवीस

यांच्याकडे पत्राद्वारे मांडली असल्याचे आठवले यांनी सांगितलं आहे. चर्चेदरम्यान तुम्हाला जागा का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटलांवर आरोप केला. विखे पाटलांनी लिहिलेल्या पत्रात आरपीआय पक्षाला जागा देऊ नका असं त्यांनी म्हंटलं होतं, असं वक्तव्य करत आठवलेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!