Monday, May 27, 2024

जळके बुद्रूकच्या पोलीस पाटलावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

मद्य प्राशन करून मारहाण केल्याने जळक्याच्या पोलीस पाटलावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबद बळीराम दत्तात्रय नाईक (वय 50 वर्षे) धंदा-शेती रा-जळके बु ता-नेवासा यांनी शिव संगिता हॉस्पीटल नेवासा फाटा येथे ICU विभागात उपचार घेत असतांना पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे की, मी वरील ठिकाणी घरामध्ये पत्नी-सुनिता, दोन मुले-आदिनाथ व चैतन्य असे एकत्र राहवयास असुन शेती करुन परिवाराची उपजिवीका भागवतो. माझे चुलत मावस भाउ अशोक कारभारी पुंड हा आमचे जळके बुद्रुक गावामध्ये राहवयास असुन त्यास दारुचे व्यसन आहे.

दि.06.04.2024 रोजी 08:15 वाजेच्या सुमारास मी आमचे गावातील मारुती मंदीराजवळ असतांना तेथे आमचे गावातील अशोक कारभारी पुंड हा दारु पिवुन आला व मला विनाकारण शिवीगाळ दमदाटी करु लागला. त्यावेळी त्यास समजावुन सांगत होतो कि तु दारु पिलेला असुन मला विनाकारण शिवीगाळ करु नको. त्यावर तो पुन्हा मला शिवीगाळ करु लागला. तो दारु पिलेला असलेने मी त्या ठिकाणावरुन घरी निघुन गेलो. रात्री 08.45 वा सुमारास आमचे राहते घरासमोर मी व माझी पत्नी सुनिता असे असतांना तेथे अशोक कारभारी पुंड हा मोटार सायकलवरुन आला तो दारुच्या नशेत होता. आल्यानंतर लागलीच त्याने त्याचे जवळ असणारे ऑनलाईन मिळणारे फोल्डींग लोखंडी स्टिकने माझ्या डोक्यावर दोन ठिकाणी जोरात मारलेने माझ्या डोक्यावर जखमा होवुन रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर त्याने त्याच स्टिकने माझे पाठीत जोरजोरात मारले. त्यावेळी माझी पत्नी सुनिता ही मला सोडविण्यासाठी मध्ये आली असता तीला अशोक पुंड याने तोंडा हाताने दोन चापटी मारल्या. आम्ही आरडा ओरड केलेने त्या ठिकाणी आमचे शेजारी राहणारे 1) शुभम त्रिंबक नाईक 2) विजय दत्तात्रय नाईक असे तेथे आले. त्यांनी अशोक पुंड याने मला आणखी मारहाण करु नये म्हणुन त्याला बाजुला केले व त्याचे हातातील स्टिक काढुन घेतली. दरम्यान सदर ठिकाणी अशोक पुंड याचा चुलत भाउ प्रमोद एकनाथ पुड रा-जळके बु ता-नेवासा हा तेथे आला व त्याने अशोक पुंड याची TVS मोटार सायकल घेवुन गेला. त्यांनतर मला 1) शुभम त्रिंबक नाईक 2) विजय दत्तात्रय नाईक 3) तुळशीराम हरिश्चंद्र झगरे अशांनी प्रथम ग्रामिण रुग्णालय नेवासा फाटा व त्यांनतर शिव संगिता हॉस्पीटल नेवासा फाटा येथे अॅडमिट केले आहे.

तरी दि.06.04.2024 रोजी रात्री 08.15 वाजेच्या सुमारास जळके बु गावात मारुती मंदीराजवळ अशोक कारभारी पुंड रा-जळके बु ता-नेवासा याने दारु पिवुन मला विनाकारण शिवीगाळ केली म्हणुन मी त्यास समजावुन सांगितलेचा राग मनात धरुन रात्री 08.45 वा सुमारास मी आमचे घरासमोर असतांना तेथे अशोक कारभारी पुंड याने त्याचे TVS मोटार सायकल (नंबर सांगता येत नाही) वरुन येवुन ऑनलाईन मिळणारे फोल्डींग लोखंडी स्टिकने माझ्या डोक्यात दोन ठिकाणी मारुन जखमी करुन दुखापत केली आहे. तसेच पाठीत मारुन दुखापत केली आहे म्हणुन माझी त्याचे विरुध्द फिर्याद आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात
अशोक पुंड याच्यावर भादवी कलम 324,323,504, मुंबई पोलीस अॅक्ट 85/1 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.दरम्यान आरोपी अशोक पुंड हा
जळके बुद्रूकच्या पोलीस पाटील पदावर कार्यरत असल्याचे समजते.

दरम्यान सदर घटनेबाबत काल शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळताच जाधव यांनी तातडीने शासकीय वाहन जळका बुद्रुक येथे धाडले होते. त्यावेळी जळका बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक पुंड हे मद्य प्राशन करू केलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यांची काल रात्री मद्यप्राशन केल्याबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने हे करीत आहेत.
पोलीस पाटलावर गुन्हा नोंद झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा अहवाल कारवाईकामी
प्रांत अधिकारी अहमदनगर यांना तातडीने सादर केलेला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

*कोणाचाही मुलाहिजा नाही…

कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करेल तर कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही.
धनंजय अ. जाधव
पोलीस निरीक्षक,

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!