Monday, May 27, 2024

अवकाळी पावसाची हजेरी, पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता कायम

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2024) अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची

शक्यता कायम आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच बुलढाणा,

अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही आयएमडीकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये

तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.राज्यात इतर ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसणार आहे. किनारपट्टी भाग वगळता राज्यात

इतर अनेक ठिकाणी आज पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांत आकाश निरभ्र आणि कोरडं वातावरण पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 23°C च्या आसपास असेल. सोमवारी नाशिक येथे 17.1 °C हे सर्वात कमी किमान तापमान होते. तर सोलापुरात सर्वाधिक 42.2°C तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!