Monday, May 27, 2024

वाकडी येथे विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी गेलेल्या 5 व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील वाकडी येथे विहीरीत पडलेले आहेत मांजराला वाचण्यास केले होते 5 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ऐन पाडव्याच्या दिवशी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडल्याने वाकडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की व्यवस्था केली वाकडी येथील अनिल बापूराव काळे यांच्या वस्तीजवळ वापरत नसलेली 40 ते 50 फूट खोलीची जुनी विहीर आहे.या विहिरीत गाईंच्या गोठ्यातील शेण-मूत्र सोडले जाते.काल मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी पाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता सदर विहिरीमध्ये मांजर पडले असता त्या मांजरीला काढण्यासाठी

विशाल अनिल काळे उर्फ बबलू (वय 28 वर्षे) हा विहिरीमध्ये उतरला असता विहिरीतील शेण-मूत्र मिश्रित पाण्यामध्ये बुडू लागल्याने त्याचे वडील अनिल बापूराव काळे (वय 55 वर्षे) हे विहिरीत उतरले.ते ही बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी माणिक गोविंद काळे (वय 65 वर्षे) हे विहिरीत उतरले,त्यांनतर संदीप माणिक काळे (वय 32 वर्षे) हे विहिरीत उतरले

,त्यांनतर त्यांना वाचवण्यासाठी विजू माणिक काळे (वय 35 वर्षे) हे विहिरीत उतरले,त्यांनतर त्यांचे कडे असलेला गडी  बाबासाहेब गायकवाड (वय 40 वर्षे) हा ही विहिरीत उतरला.एकमेकांना वाचविण्यासाठी एका पाठोपाठ उतरलेले ५ जण विहिरीतील शेण-पाणी मिश्रित गाळा मध्ये अडकून मृत पावले आहे.विहिरीत शेण-मूत्र मिश्रित पाणी असल्याने विहिरीत गॅस तयार होऊन त्याने गुदमरून मेल्याची घटना घडली आहे.

तर विजय माणिक काळे (वय 35 वर्षे)हा विहिरी तील गॅसने गुदमरल्या मुळे त्याला नगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच नेवासाचे तहसीलदार डॉक्टर संजय बिराजदार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे घटना पोहचले असुन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक रेसिक्यु टीमसह वाकडी येथे पोहोचत आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी मडपंप पंप टाकून काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

*विहिरीत बुडून मृत्यू झालेले व्यक्ती असे*

१. बबलू अनिल काळे (वय 28 वर्षे)

२.अनिल बापूराव काळे (वय 55 वर्षे)

३. माणिक गोविंद काळे (वय 65 वर्षे)

४. संदीप माणिक काळे (वय 32 वर्षे)

५.बाबासाहेब गायकवाड (वय 40 वर्षे)

*नगर येथे उपचारार्थ दाखल व्यक्ती*

१.विजय माणिक काळे (वय 35 वर्षे

विहिरीत पडलेले मृतदेह यांना बाज, खाट, रस्या,गळ यांच्या साह्याने बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न करण्यात आल्यानेविहिरीत पडलेला विशाल अनिल काळे याचा पहिला मृतदेह रात्री ९:२५ वाजता बाहेर निघाला.त्यानंतर ज्ञानेश्वर साखर कारखान्यावरून हायफ्लोपंप आणून विहिरीतील गाळ उपसण्यात आला. त्यानंतर रात्री १०:२० नंतर उशिरा उर्वरित मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आले.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला,
अप्पर पोलीस अधीक्षक वैभव, उपविभागी पोलीस अधिकारी सुनील पाटील,प्रांत सुधीर पाटील, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल ,पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी हजर राहून समन्वयाने काम केले.घटना समजल्या पासून विठ्ठलराव लंघे,अंकुश काळे हे घटनास्थळी उपस्थित होते.मदत यंत्रणा सज्ज करण्याकामी त्यांची हि मोठी मदत झाली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!