Thursday, May 9, 2024

निलेश लंकेनी घेतली प्रचारात आघाडी गाव भेटीवर भर , मतदारांना भावला साधेपणा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गड इथून

शुभारंभ जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थिती केला.नगर लोकसभा मतदारसंघासाठी पारनेरचे निलेश लंके यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच निलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

याआधी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रा काढली होती. त्यानंतर आता निलेश लंके यांनी स्वाभिमान जनसंवाद यात्रा करत आहेत. मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात झाली आहे.लंके प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

नगर लोकसभा मतदारसंघांतील तालुके आणि गावात ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके जनतेची संवाद साधला जात आहे.पाथर्डी, शेवगाव, राहुरी तालुक्यात ही यात्रा गेली आहे.पुढे आता ही यात्रा जामखेड तालुक्यात आहे. यात्रेला तरुणांपासून जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लंकेचा साधेपणा मतदारांना भावला आहे.प्रत्येक गावात निलेश लंके यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या यात्रेमध्ये महाविकास आघाडीतील सर्व नेते, कार्यकर्ते एकदिलाने सहभागी होत आहे.निलेश लंके यांनी कोरोना काळात चांगले काम केले होते ते संपूर्ण राज्याने बघितलं आहे.

सामाजिक, धार्मिक कामात तरुणांच्या अडचणी सोडविण्यासाठी लंके नेहमी अग्रेसर असतात.आमदार असताना मतदार संघातील असंख्य प्रश्न मार्गी लावले आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!