Monday, May 27, 2024

खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा शुक्रवारी नेवासा तालुका दौरा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा उद्या शुक्रवारी दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत नेवासा तालुका संवाद दौरा होणार असल्याची माहिती  शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांनी दिली.

   या दौऱ्यात दि.१२ रोजी सकाळी ९  वाजता पाचेगाव,१० वाजता नेवासा बुद्रुक,११ वाजता नेवासा फाटा,दुपारी १२ वाजता भानसहिवरा,दुपारी १ वाजता भेंडा व संत नागेबाबा कार्यालय येथे स्नेहभोजन. त्यानंतर दुपारी ३ वाजता कुकाणा,दुपारी ४ वाजता बालाजी देडगाव,संध्याकाळी ५ वाजता माका,संध्याकाळी ६ वाजता चांदा व त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता घोडेगाव अशी या दौऱ्याची रूपरेषा राहणार आहे.सदर दौऱ्यात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे यांची प्रमुख उपस्थितीत हा दौरा होणार आहे.
   सदर संवाद दौऱ्यात वरील गावांच्या ठिकाणी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे, तालुका प्रमुख सुरेशराव डीके,संजय पवार,जेष्ठ विधी तज्ञ अँड.के.एच. वाखुरे,भाऊसाहेब वाघ,शहर प्रमुख बाबा कांगुणे,महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीराताई गुंजाळ,युवा सेनेचे शुभम उगले,संपर्क प्रमुख बापूसाहेब दारकुंडे, प्रकाश निपुंगे,अंबादास रोडे,उप तालुका प्रमुख भारत चौगुले,बंडू शिंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भीमराज शेंडे,रासपचे तालुकाध्यक्ष गोरख होडगर,मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर पवार,आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!