Monday, May 27, 2024

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही भागात उन्हाच्या झळा लागत आहे. सातत्यानं

राज्यातील हवामान बदल (Climate change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान, आजही हवामान विभागानं (IMD) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी (Orange alert) करण्यात आलाय. तर मराठवाड्यासह मध्य पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. दरम्यान विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा

ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना हवामान विभागाकडून दिल्या जातात.

नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काल रात्री जोरदार मेघगर्जनेसह नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज नागपूरसह गोंदिया, अमरावती,

अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तर गडचिरोली चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि भंडारा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. गेले दोन दिवस विदर्भातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचा नुकसान होत आहे.

मात्र, अवकाळी पावसामुळं तापमानात घसरण होऊन एप्रिल महिन्यात दिसून येणारा कडक वैदर्भीय उन्हाळा सध्या तरी दिसून येत नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!