Wednesday, May 1, 2024
spot_imgspot_img

पालकमंत्री विखेंकडून वाकडीतील काळे कुटुंबियांचे सांत्वन

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वाकडी येथील काळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

नेवासा तालुक्यातील वाकडी येथे विहिर दुर्घटनेत 5 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाडव्याच्या दिवशीघडली होती.
त्यामुळे वाकडी परिसरावर शोककळा पसरली होती.या दुर्दैवी घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार दि.11 रोजी दुपारी वाकडी येथे जाऊन काळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून धीर दिला.तसेच डॉक्टरशी संपर्क साधुन नगर येथे उपचार घेत असलेल्या विजय काळे याच्या प्रकृतिची चौकशी केली.

त्यांचे सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,कडुबाळ कर्डिले,भाजपा नेते नितीन दिनकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे,भाजपा श्रीरामपुर तालुकाध्य दीपक पटारे, नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.

*बुडाल्याने मृत्यू…*

दरम्यान वाकडी येथील दुर्घटनेतील मृत पावलेल्या पाचही व्यक्तींचे पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त झाले असून पाचही मृतकांचा मृत्यू हा बुडाल्याने झाला असा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!