Monday, May 27, 2024

नागेबाबा पतसंस्थेचे अपघाती मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्याचे वारसाला १० लाख विमा रक्कम अदा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वैजापूर शाखेचे अपघाती निधन झालेले कर्मचारी कै. शिवानंद भाऊसाहेब निंबाळकर यांचे वारसाला नागेबाबा सुरक्षा कवच योजने अंतर्गत १० लाख रुपये विमा नुकसान भरपाईचा धनादेश सुपुर्द करण्यात आला आहे.

अ.नगर येथील नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक आदरणीय चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून सभासद-कर्मचारी यांचेसाठी संस्थेमार्फत
“नागेबाबा सुरक्षा कवच” योजना चालू करण्यात आलेली आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत १० लाखांची अपघाती विमा भरपाई रक्कम वारसदारांना देण्यात येतो व ५ लाखापर्यंत अपघाती हॉस्पिटल खर्च देण्यात येतो.
वैजापूर शाखेचे कर्मचारी कै. शिवानंद भाऊसाहेब निंबाळकर रा.सिरसगाव, ता वैजापूर यांचे यांचे मागील वर्षी अपघातामध्ये निधन झाले होते.
त्यांच्या मागे दोन वर्षाचा मुलगा, पत्नी व आई-वडील असे कुटुंब आहे. त्याची विमा कंपनी कडून नुकसान भरपाई रक्कम मिळाली असून त्यांच्या कुटुंबीयांना या सामाजिक उपक्रमा अंतर्गत १० लाख रुपये रकमेचा धनादेश देण्यात आला.
यावेळी अजित रसाळ, आबासाहेब काळे, राजेंद्र चिंधे, सुभाष चौधरी, अवधूत लोहकरे, सुनील गव्हाणे, वैजापूर शाखेचे सभासद प्रभाकर मते, शरद पवार, रामेश्वर नेहे, गावातील संस्थेचे सभासद व नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!