Wednesday, May 1, 2024
spot_imgspot_img

पानेगांवची माॅडेल व्हिलेजकडे वाटचाल- समर्थ शेवाळे

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

पानेगांव ग्रामपंचायतीची माॅडेल व्हिलेज कडे वाटचाल सुरु असल्याचे गौरवोद्गार अहमदनगर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांनी
काढले.

नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे दि.१० रोजी श्री. शेवाळे यांनी भेट देऊन येथे शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.
ग्रामपंचायत कार्यालय झालेल्या चर्चासत्रात त्यांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पाणीपुरवठा कर्मचारी ऑपरेटर तसेच ग्रामस्थ यांना स्वच्छ भारत मिशन, वसुंधरा योजना,पाणी आडवा,पाणी जिरवा, जल जिवन,वृक्षारोपण, हर घर शुद्ध जल, बचतगट चळवळ, अंगणवाडी रेन हार्वेस्टिंग,पाणी पट्टी, घरपट्टी, गावातील दुकान कर वसुली आदीवर मार्गदर्शन करुन पानेगांव ग्रामपंचायत अंतर्गत विकास योजना समाधानकारक आहेत. परंतु कर वसुली मोठी थकीत आहे. शासनाच्या वतीने विविध पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी पानेगांव ग्रामपंचायत पात्र आहे. यासाठी कर वसुली १००% होणे गरजेचे आहे. गावच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे शेवाळे यांनी सांगितले.

सोनई-करजगांव १८ गांव प्रादेशिक पाणी योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांनी गावच्या विकास कामांची माहिती दिली.
लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले, उपसरपंच दत्तात्रय घोलप, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व एक दिलाने काम करतो.
नेवासा पंचायत समिती विस्तार अधिकारी सुवर्णा लेंडे,अमोल गांगुर्डे, सुहास मिरपगार, माजी उपसरपंच रामराजे जंगले, सतिश जंगले, मच्छिंद्र खेमनर भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले,ग्रामपंचायत सदस्य रमेश जंगले,सौ.दिपाली जंगले, संदिप जंगले,सागर आंबेकर,चिऊ आंबेकर,गणेश गायकवाड,सुनिल चिंधे, बाबासाहेब शेंडगे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब नवगिरे यांनी प्रास्ताविक केले ‌‌.सुभाष गुडधे यांनी आभार।मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!