Wednesday, May 1, 2024
spot_imgspot_img

शरद पवारांची या तारखेला नगरमध्ये सभा; जोरदार तयारी सुरू

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे राज्यभर दाैरे करणार आहे. बुधवारी (ता. १७) राेजी नीलेश लंके यांच्या प्रचारानिमित्त पवार यांची नगरमध्ये ताेफ धडाडणार आहे. त्यामुळे ते काेणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.शरद पवार यांचा साेमवार (ता. १५) पासून राज्यभर प्रचार दाैरा सुरू हाेणार आहे. सातारा, सोलापूर, नगर असा पवारांचा दाैरा असणार आहे. साेमवार (ता. १५) सातारा दाैऱ्यावर असणार आहे.

पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज पवार यांच्या उपस्थित भरण्यात येणार आहे. मंगळवार (ता. १६)  सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यावेळी पवार हे उपस्थित राहणार आहे,

तर बुधवार (ता. १७) राेजी नगर लाेकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये सभा पार पडणार आहे. त्यावेळी पवार काेणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!