Wednesday, May 1, 2024
spot_imgspot_img

महाराष्ट्रात गारपिटीसह मुसळधार पाऊस होणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या

कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.दरम्यान, हवामान विभागानं पुढील ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.

नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!