Monday, May 27, 2024

राधा ही भक्तीची अखंड धारा-स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

फुल व सुंगध आणि गुळ व गोडी हे शब्द रूपाने दोन असले तरी वस्तू रूपाने एकच आहेत. तदवतच राधा आणि कृष्ण हे ही एकरूप आहेत.राधा ही भक्तीची अखंड धारा असल्याने भागवत कथेत राधेच्या भजनाला महत्व आहे असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तरअधिकारी भागवताचार्य स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीमद भागवत कथेचे २ रे
पुष्प गुंफतांना भागवताचार्य प्रकाशनंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, जीवनात रामाचे आचार,कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार असेल तर जीवन आदर्श बनते.भक्त नेहमीच ईश्वराकडे काही ना काही मागत असतो. भगवंताला भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याच्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतात. श्रीमद भागवत कथा हे अठरावे पुराण लिहिले. गुरू आणि शिष्य दोघेही एकमेकांच्या शोधात असतात. संतांच्या दृष्टीत अमृत असते.भक्ताला भगवंताची भाषा समजत असते. भगवंत आणि भक्त याचं एक अतूट नातं आहे. भागवत धर्म नेहमीच चांगली शिकवण देत असतो. कलियुगात चांगल्या व्यक्तींना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.
कथेच्या दुसऱ्या दिवशी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!