Friday, May 3, 2024

श्रीकृष्णाचे वाड्मयीन स्वरूप म्हणजे भागवत कथा-स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

समाजाला उपदेश करण्यासाठी भंगवंताने घेतलेला अवतार म्हणजे कलावतार आहे,तर व्यास हे भगवंतांचा कलावतार आहे.व्यासांनी भागवताच्या रूपाने घरा घरात गंगा प्रवाहित केली भागवत कथा ही श्रीकृष्णाचे वाड्मयीन स्वरूप आहे
असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तरअधिकारी भागवताचार्य स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ
आयोजित श्रीमद भागवत कथेचे ३ रे
पुष्प गुंफतांना भागवताचार्य प्रकाशनंदगिरी महाराज पुढे म्हणाले की,
संत महात्मे साधूंच्या प्रेमाला पात्र झालेले हे भेंडा गाव आहे.भेंडा गावामध्ये भागवत रुपी गंगा प्रवेश झालेली आहे. भागवतामुळे जीवनातील पापांचा नाश होतो. गुरुवर्य भास्करगीरीजी महाराजांचे जीवन हे स्वच्छतेकडून समृद्धीकडे, संस्काराकडून आदर्श संस्कृतीकडे आणि पावित्र्याकडून भक्तीकडे घेऊन जाणारे जीवन आहे. गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांचे निरपेक्ष,तपस्वी आणि साध्वी जीवन आहे.भेंडा गावाची आमची जाळ जुळलेली आहे. बालपण येथेच गेलेले आहे.गुरुवार दि.१८ रोजीच्या कथेत त्यांनी चतुःश्लोकी भागवत विदुर चरित्र कपिल देवहती संवाद, सतिचरित्र, ध्रुव चरित्र, राजा जडा रत चरित्र यावर निरूपण केले.
स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांचे माता-पिता यांचे सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!