Monday, May 27, 2024

प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या अध्यात्मिक क्षेत्राचे फाउंडेशन स्वर्गीय घुले पाटलांकडे-भास्करगिरीजी महाराज

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

श्रीसंत नागेबाबा व बजरंग बलीच्या या पावन भूमीत स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या कर्तुत्वाने निर्माण झालेली ही सहकाराची गंगा आहे. विशेत: जो कारखाना आपला उभा आहे, त्याच्यातून साखर निर्माण होते. त्याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रामधून अनेक अधिकारी, पदाधिकारी, देश सेवक हे निर्माण झालेले आहेत आणि होत आहेत.
त्यात विशेष म्हणजे या शैक्षणिक क्षेत्रा मधूनच प्रकाशानंदगिरीजी महाराज हे ही अध्यात्म क्षेत्रात ध्वज फडकवू राहिले आहेत. याच फाउंडेशन स्वर्गीय घुले पाटलांकडे जाते असे प्रतिपादन
देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त सुरू असलेल्या 
प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगीं बोलताना भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले की,
माउलींनी प्रेरणा दिली आणि घुले पाटलांनी भेंड्याचे माळरान कारखाना, शिक्षणसंस्था उभे केले. त्यांच्या परिवारातील नरेंद्र घुले पाटील ,चंद्रशेखर घुले पाटील,त्यांचे सर्व कार्यकर्ते व सर्वांचेच सहकार्याने आणि मदतीने ही सहकार गंगा या ठिकाणी वाहून राहिलेली आहे.त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे हे बजरंग बलीचे देवस्थान.सेवे करिता कारखान्यातील सर्व लहान थोर, सर्व अधिकारी-पदाधिकारी,कर्मचारी तन मन धनाने सहभागी होतात. हे काम करण्याची धुरा आपण श्रीराम सेवा मंडळावर टाकली आहे.सर्व कार्य हळूहळू आपल्या सहकार्य, आपल्या शक्तीने, आपल्या भक्तीने हे आतापर्यंत एवढं केलेले आहे.आज पर्यंत अनेक संत महंत येथे येऊन गेले. देवदेवतेचा आणि संतांचा ,संत श्रेष्ठ नागेबाबांचा, बजरंगबलीचा कृपाशिर्वाद,मीराबाई महाराज मिरीकर यांचे आशीर्वाद घेऊन आपण हे सर्व कार्य केलेले आहे.
सर्व संतांचा आपल्याला आशीर्वाद आहे.

भेंडा गाव, कारखाना, एवढा परिसर आपण एवढेच आहोत असं काही मानायचे आवश्यकता नाही.संपूर्ण देश,विश्वामधील आपण एक घटक आहोत. हिऱ्याला जसे वेगवेगळे पैलू पाडलेले जातात तसा आपला एक पैलू आपल्या कार्याचा आहे.त्या पैलू मुळे हिरा चमकत असतो. तो अधिकाधिक चमकण्या करीता बाह्य सहकार्याची गंगा सतत वाहिली पाहिजे. त्यासाठी त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे.
समाजसेवेचे, देश सेवेचे, दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रताला अध्यात्माची गंगा वाहत राहिली पाहिजे. अध्यात्म हे मूळ उगम
स्थान आहे. त्याची ही केंद्र स्थाने आहेत.

प्रपंचामध्ये पती-पत्नी विचाराने एकमेकाला पोषक असणे महत्त्वाचे आहे.केवळ कपड्यांची मॅचिंग करता येते पण विचारांची मॅचिंग करता येत नाही.राम कथा,भागवत कथा या विचारांची मॅचिंग करण्याकरिता आहेत. कथा ही महान बनविणारी, दुःख संपवणारी आणि मुक्ती प्राप्त करून देणारी आहे.कथेने माणसाचं मन पवित्र होते.प्रभूंचे चरित्र हे आपल्याला महान बनवते,त्याग शिकवते आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने समर्पण शिकवते.यावेळी सुनीलगिरीजी महाराज हे ही उपस्थित होते.

*नसलेले पण लादलेले ओझं खाली ठेवायचे आहे...

नेता कोणत्या पक्षाचा आहे हे पाहू नका तर राष्ट्राकरिता आणि अडलेले नारायणाकरिता काय करते ते पहावे.
पक्ष जात धर्म हे लाधलेले असतात.
लाधलेल्या गोष्टी,उचललेल्या गोष्टी कधी तरी त्या खाली ठेवाव्या लागतात.नसलेले पण लादलेले ओझं आपल्याला खाली ठेवायचे आहे. आणि सर्वांच्या सुख समाधानासाठी शांतीचा संदेश द्यायचा आहे.
-भास्करगिरीजी महाराज

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!