Saturday, May 4, 2024

राम नाम जपाने पापातून मुक्ती मिळते- स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

ज्यांच्या दरात गाय आहे,त्यांच्या घरात नेहमी गंगा यमुनेचा संगम असतो. त्यामुळे गोमातेचे पूजन करा.राम नाम जपाने सर्व पापातून मुक्ती मिळते असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी केले आहे.

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीमद भागवत कथेचे ६ वे पुष्प गुंफताना स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज पुढे म्हणाले की, ज्यांचे जसे कर्म तसे फळ मिळत असते.भगवान श्रीकृष्णाने ब्रजमध्ये बालपणीच अनेक लीला केल्या, जे उत्स्फूर्तपणे उपासकांच्या हृदयाला आपुलकीच्या भावनेने आकर्षित करतात. म्हणून भागवत भजनाच्या माध्यमातून आपण भगवंताच्या खऱ्या रूपाचे चिंतन करतो.कथेत लीन होऊन कथा ऐकल्याने मनुष्य घडतो, वेदना दूर होतात. मनापासून कथा ऐकलीत तर प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव येईल.
श्रीकृष्ण जन्म,गोकुळातील लिलांचे वर्णन,पुतनामोक्ष, तृणार्वत उद्धार,माती भक्षण लीला,उखळ बंधन लिला,कलिया मर्दन,गोवर्धन पर्वत लिला, ब्रह्म कांड लीला , वेणुगीत महाराज लिला, गोपी गीत ,कंस मर्दन लिला यावर विवचन केले.

देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सौ. निवेदिता गडाख,बजरंग विधाते,राम विधाते, शुभम महाराज बनकर ,बाळासाहेब महाराज कानडे,गणेश महाराज आरगडे, बंशी महाराज गर्जे,चावरे महाराज यांनी कथेला हजेरी लावली.

*श्रीकृष्ण जन्म साजरा

कथेच्या पाचव्या दिवशी कृष्ण जन्म हा साजरा करतात परंतु पावसामुळे कथेत व्यक्त आल्यामुळे तो कृष्णजन्म सोहळा सहाव्या दिवशी साजरा करण्यात आला. फुलांची उधळण,फटाक्यांची आतषबाजी, कृष्ण नामाचा जयघोष करत कृष्ण जन्म साजरा करण्यात आला.सुंठवडा प्रसाद वाटण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!