Saturday, May 4, 2024

सर्व पुराणात भागवत पुराण श्रेष्ठ-प्रकाशानंदगिरिजी

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

आपण जे जे करतो ते भगवंताला समर्पित करायचे हाच भागवत धर्म आहे.भागवताचे सार म्हणजे प्रभूचे चिंतन होय.सर्व पुराणात भागवत पुराण श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीमद भागवत कथेचे शेवटचे ७ वे पुष्प गुंफताना स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज पुढे म्हणाले की, साधूचे जीवन हे सूर्यसारखे प्रकाशित असावे, निर्मल, निराकार,एकाग्र,आकाशा सारखे विशाल आणि पाण्या सारखे नितळ असावे.द्वारकाधिक श्रीकृष्ण आपल्या पुत्रांना उपदेश करतांना म्हणतात माणसा जवळ तारुण्य,सौंदर्य,सत्ता आणि संपत्ती असेल परंतु विवेक नसेल तर त्याच्या जीवनाचा विनाश झाल्याशिवाय रहात नाही. कोणाची निंदा आणि संतांचा अपमान करून नये. मनुष्य देह हा दुर्लभ आणि क्षणभंगुर आहे. मानव देहाचे सार्थक आणि कल्याण भगवत भक्तीत आहे.प्रभूची भक्ती आणि प्राप्ती करायची असेल तर भागवत धर्म आचारावा लागतो.कथेच्या समारोपाकडे जातांना भ्रमरगीत,रुख्मिणी स्वयंवर लिला, सुदामदेव चरित्र, यादवांना ऋषी श्राप, उद्धवाला उपदेश,कलयुगाच वर्णन, परिक्षीत उद्धार यावर विवेचन केले.

या भेंडा गावात कुठे जाण्याचा योग आला तर जुने दिवस आठवतात, लोकनेते मारूतरावजी घुले यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. २० वर्षांचा कालावधी याठिकाणी गेला. येथील माणस,शालेय जीवन, आदर्श शिक्षक, धार्मिक वातावरण, आध्यात्मिक संस्कार, बालवयात दक्षिण मुखी मारूतीच्या दर्शनासाठी नेहमी येत असे. आज माझे अंतःकरण भरुन आले असे स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी सांगितले

श्रीराम सेवक बापूसाहेब नजन यांनी आभार मानले.

*गुरुमाता व गुरुपित्याचे मिळाले आशीर्वाद*
कथेच्या शेवटच्या दिवशी गुरूवर्य मिराबाईंचे कृपा आशीर्वाद मिळाले, मर्यादा पुरुषोत्तम जीवन बाईंचे आहे.आई एका लेकरांचे कौतुक करण्यासाठी व कथा ऐकण्यासाठी आल्या.मी भाग्यवान आहे की, गुरुमाता मिराबाईं व गुरुपिता भास्करगिरी बाबा मला मिळाले.

*गुरूवर्य बाबांनी योग्य व्यक्तीची निवड केली-मिराबाईं महाराज मिरीकर*

देवगड देवस्थानच्या उत्तराधिकारी म्हणून स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांची निवड बाबांनी केली ती योग्य व्यक्तीची निवड केली. स्वामीजीचा खूप अभ्यास आहे, भेंडा याठिकाणी स्वामींची कथा होत आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात असे मिराबाईं महाराज मिरीकर म्हणाल्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!