Thursday, May 23, 2024

निवडणूक निरिक्षक अजयकुमार बिश्त यांचे शिर्डीत आगमन 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी, दि.२४ एप्रिल २०२४ 

शिर्डी लोकसभा निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निरिक्षक म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी अजय कुमार बिश्त यांची नियुक्ती केली असून त्यांचे आगमन शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. आज राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर व विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणुक कालावधीत अजय कुमार बिश्त यांचा निवास शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात असणार आहे. नागरिकांच्या भेटीसाठी विश्रामगृहातील बैठक कक्ष (मिटिंग हॉल) येथे ते सकाळी 10:00 ते 11:00 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9579391016 हा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!