Monday, May 6, 2024

शिर्डी लोकसभेसाठी नेवासा तालुक्यातील अभिजित पोटे, राजेंद्र वाघमारे, शंकर भारस्कर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

२५ एप्रिल अखेर शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यात नेवासा तालुक्यातील
अभिजित पोटे, राजेंद्र वाघमारे व शंकर भारस्कर या तीन जणांनी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल दाखल केले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी  २५ एप्रिल अखेर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे), सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना),चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष),अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष),भारत संभाजी भोसले (समता पार्टी),नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी),गोरक्ष तान्हाजी बागुल (अपक्ष),अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष),अ‍ॅड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष),अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी),सतिष भिवा पवार (अपक्ष),संजय पोपट भालेराव (अपक्ष),रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी),राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी),उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी),गंगाधर राजाराम कदम (अपक्ष),भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष),प्रशांत वसंत निकम (अपक्ष),नचिकेत रघुनाथ खरात (अपक्ष),संजय हरीश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रान्ती पार्टी), चंद्रहार त्र्यंबक जगताप (अपक्ष), रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष), विजयकुमार गोंविंदराव खाजेकर (अपक्ष), सना मोहम्मद अली सय्यद (अपक्ष), शंकर संभाजी भारस्कर (अपक्ष),दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष), डॉ. अशोक बाजीराव महांकाळे (अपक्ष),जयाबाई राहुल डोळस (अपक्ष),
संतोष तुळशीराम वैराळ (अपक्ष), सतीष भुपाल सनदी (अपक्ष) या उमेदवारांनी
नामनिर्देशन दाखल केले आहेत.
या ३१ उमेदवारांमध्ये एकट्या नेवासा तालुक्यातील तीन उमेवारांचा समावेश आहे.

*अभिजित पोटे*

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील अभिजित अशोकराव पोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.श्री.पोटे हे आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष असुन शेतकरी-कष्टकरी यांच्या करिता लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.नेवासा तालुक्यासह शिर्डी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे.

*राजेंद्र वाघमारे*

नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील रहिवासी असलेले राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनी राष्ट्रीय जनक्रान्ती पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्री.वाघमारे हे अ.नगर जिल्हा परीषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्याच बरोबर अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ही कार्यरत होते. शिर्डी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास ते इच्छुक होते.त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपासून जोरदार मोर्चे बांधणी ही केली होती मात्र महाविकास आघाडी मध्ये शिर्डीची जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला गेल्याने नाराज झालेल्या राजेंद्र वाघमारे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय जनक्रान्ती पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

*शंकर भारस्कर*

नेवासा तालुक्यातील वडूले येथील रहिवासी असलेले शंकर संभाजी भारस्कर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. श्री.भारस्कर हे कुकाणा पंचायत समिती गणातून निवडून आले होते. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी कार्यकिर्द उत्तम राहिली. नेवासा तालुक्यात त्यांच्या दांडगा जनसंपर्क आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!