Monday, May 27, 2024

जरांगेंची मोठी घोषणा! 288 मतदारसंघात देणार उमेदवार

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभेला राज्यतील 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. तर राजकीय पक्षांचं टेन्शन वाढलंय.लोकसभेला उमेदवार दिले नाही, मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलोय. विधानसभेला 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार

असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी विधानसभेचं रणशींग फुंकलंय.मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत, आम्ही विधानसभेची तयारी एक महिन्यांपासून सुरु केली आहे. मराठे, दलित आणि मुस्लिम बांधवानी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

आम्ही आता तयारीला लागलोय.प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला मतदानाचा हक्क बजावला. परभणी मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. छत्रपती संभाजीनगरहून ते रुग्णवाहिकेतून मतदानकेंद्रापर्यंत

पोहोचले..यावेळी प्रत्येकानं मतदान करण्याच आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, 100 टक्के मतदान करणं आवश्यक आहे. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. यात आपण आजारी असो की काही असतो, नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडलं आहे.

 जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केलीय. त्यामुळे मराठा आंदोलक उमेदवार अपक्ष रिंगणात उतरणार की मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षाची स्थापना करणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरमार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!