Thursday, May 9, 2024

तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका ‘या’ 3 गोष्टी; चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आपले अमूल्य विचार श्लोकांमध्ये मांडले आहेत. चाणक्य यांनी आपले विचार आयुष्य, व्यवसाय, सामाजिक जीवन, नैतिक आचरण, अर्थव्यवस्था या प्रत्येक विषयांत सांगितले आहेत.

आचार्यांच्या विचारांचं पालन केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक आणि महत्त्वाचे बदल घडतात.  खरंतर, आचार्य चाणक्य यांचं खरं नाव विष्णुगुप्त होतं आणि त्यांच्या पित्याचं नाव चणक असं होतं. आपल्या वडिलांच्या नावावरूनच त्यांना लोक चाणक्य म्हणायचे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या सिद्धांतात जे मूल्य, विचार मांडले होते ते आजच्या काळातही सगळ्यांवर लागू होतात. धन-संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांनी कोणती तत्त्व मांडली आहेत ते जाणून घेऊयात.चाणक्य सांगतात की, पैशांची पाण्याशी तुलना करताना चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे भांड्यात ठेवलेलं पाणी

वापरलं नाही तर ते खराब होते. अगदी त्याचप्रमाणे पैसा वापरला नाही तर त्याचं मूल्यही कमी होतं. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे जमा करणे योग्य नाही. पण, जर तुमच्याकडे पैसे असतील तर ते धार्मिक कार्यात गुंतवा.तुमची संपूर्ण कमाई कोणाला सांगू नका. याशिवाय भविष्यात कोणत्याही व्यवहारामुळे तुमचं नुकसान

होत असेल तर ते कोणालाही सांगू नका. जरी ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल तरी या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा. या गोष्टी शेअर केल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय प्रतिष्ठेलाही धक्का बसतो.आपला विचार मांडताना आचार्य सांगतात की, पैशांबाबत कधीही कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घ्या. पैसे खर्च

करताना योग्य संतुलन ठेवा. अतिशय विचारपूर्वक आणि फक्त गरजांसाठी पैसे खर्च करा. जे लोक सुरक्षितता, धर्मादाय आणि गुंतवणुकीसाठी पैसा खर्च करतात ते त्यांचे जीवन योग्य मार्गाने जगतात असं आचार्य सांगतात. काही लोक पैशाला फक्त पैसा म्हणून पाहतात. पण चाणक्य म्हणतात की, फक्त धन हीच चांगली असते

जी कष्टाने मिळवली जाते. अनैतिक काम करून भरपूर पैसा मिळवला तरी तो टिकत नाही. असे पैसे नंतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या हातून निसटतातच.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!