Thursday, May 9, 2024

अत्यंत महत्त्वाची बातमी:99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, कुठे-कुठे कांदा पाठवता येणार?

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलीय. सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. केंद्राने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय.

एका दिवसापूर्वी भारत सरकारने २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती.गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिल्यानंतर देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र सरकारवर नाराज झाले होते.सरकारवर चहुबाजूंनी टीका केली जात होती. त्यानंतर केंद्र

सरकारने आज महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आलीय. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते आणि स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिलीय.केंद्र सरकारने घेतलेला निर्णय नक्कीच चांगला आहे, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.परंतु

आधी गुजरातमधील पांढरा कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर केंद्रावर टीका होऊ लागली. त्यामुळे कुठेतरी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं दिसत आहे. सरकारने ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिलीय परंतु ही पुरेशी नसल्याचं राजू शेट्टी म्हणालेत.

सरकारच्या या निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयावर शेतकरी नेते अजित नवले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन केलं जातं. ज्यावेळी निर्यात बंदी करण्यात आली होती, तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा निर्यातस बंदी उठवण्याची मागणी केली होती, त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं होतं.

त्याचवेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुजरातच्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर इतर राज्यातून टीका केली जात होती. त्याचाच परिणाम म्हणून केंद्राने ही निर्यात बंदी उठवलीय. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालावर परिणाम होईल,यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं नवले म्हणालेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!