Sunday, May 12, 2024

धडाधड त्यांचे उमेदवार पाडा,या नेत्यांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशभर लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभेचा धुराळा उडाला आहे पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षातील राहुल गांधी तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याही प्रचारसभा होत आहे. सर्वच पक्षाकडून

विविध मुद्दे हे समोर येत आहे प्रामुख्याने शेतकरी म्हटलं की कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे हाच मुद्दा सध्या निवडणुकीतही गाजत आहे.एकीकडे गुजरात मध्ये कांदा निर्यातीस परवानगी दिली जात आहे तर मोठा गजर झाल्यानंतर अजून कांदा संपूर्ण

देशातून निर्यात होणार असल्याचे जाहीर झाले मात्र हाच निर्णय आधी घेणे अपेक्षित होतं असं शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे अशातच राजू शेट्टी यांनी एक तिखट प्रतिक्रिया दिली आहे.शेतकऱ्यांनी डोळे वटरल्यानंतर सरकार घाबरून गेलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे. डोळे वटरल्यानंतर सरकार

निर्णय घेत असेल तर त्यांचे उमेदवार पाडा तरच त्यांना कांदा उत्पादका शेतकऱ्यांची ताकद कळेल असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कांदा निर्यात बंदी हटविण्याच्या निर्णयावर मत केले.राजू शेट्टी म्हणाले गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करत हाेते.

शेतकरी रस्त्यावर उतरत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हते. जसं लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागली.त्यामुळे सरकार जागे झाले. सरकराने कांदा निर्यातीस

परवानगी दिली. याचे आम्ही स्वागत करतो पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे. त्याच्यावरचे बंधन काढून टाकावं अशी आमची मागणी असल्याचे शेट्टींनी नमूद केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!