Monday, May 27, 2024

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली ?

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जवळपास पूर्ण झालं आहे.

त्यामुळे बारावीचा निकाल २५ मेच्या आधी तर दहावीचा निकाल ६ जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने राज्य मंडळ जलदगतीने तयारी करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. यंदा महाराष्ट्रात दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च आणि बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च

यादरम्यान घेण्यात आली.एकूण ३ हजार ३२० परीक्षा केंद्रांवर बारावीच्या तर, ५ हजार ८६ केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीच्या तब्बल ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा परीक्षा दिली होती. यासाठी महामंडळाने जोरदार तयारी करत अनेक ठिकाणी कॉफीमुक्त केंद्र पाहायला मिळाले होते.

दरम्यान, दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागण्याच्या दृष्टीने जलदगतीने तयारीला सुरुवात झाली आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल २५ मेच्या आधी तर दहावीचा निकाल ६ जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात.

निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!