Sunday, May 19, 2024

साखर कामगारांचा प्रामाणिकपणा;नवरीचा हरवलेला ४० हजाराचा मोबाईल केला परत

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नवरीचा हरवलेला ४० हजाराचा मोबाईल करून कामगार दिनी साखर कामगारांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला.

राज्यामध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्वत्र साजरा केला जात मअसताना याच दिवशी मुळा सहकारी साखर कारखान्याचे प्रशासनाधिकारी बी. एस.बानकर यांच्या पुतणीचा विवाह गायत्री लाॅन येथे होता. या विवाहात कलवरी कडून नवरी मुलीचा ४० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरवला.
तो मोबाइल मुळा सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा विभागातील कर्मचारी डी. डी. कावले व गोडाऊन ऑफिसचे कर्मचारी कृष्णा पिटेकर या दोन कर्मचाऱ्यांना हा मोबाईल सापडला होता. त्यांनी तो मोबाईल मंगल कार्यालयाच्या गेटवर उपस्थित असलेले कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पवार व सचिव डी.एम. निमसे यांच्याकडे आणून जमा केला.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनी या कामगारांनी प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल त्यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले, वसंतराव भोर, भाऊसाहेब बनकर, अशोकराव पवार, डी.एम. निमसे, ऑफिस सुपरडेंट योगेश घावटे, इलेक्ट्रिक इंजिनिअर श्री. पुगळे व कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाबद्दल साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!