Sunday, May 19, 2024

भेंडयातील अध्यात्मिक बाल संस्कार शिबिरात रमले विद्यार्थी

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा परिवार व श्रीराम सेवा मंडळ यांच्या विशेष सहकार्याने गणेश महाराज चौधरी यांनी आयोजीत केलेल्या अध्यात्म, विज्ञान व दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारे अध्यात्मिक बाल संस्कार शिबिरात विद्यार्थी रमली आहेत.

उन्हाळ्याचे सुट्टी मध्ये केवळ मोबाईल व टीव्ही यापासुन मुलांना दूर ठेवत त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,आरोग्यासाठी योगा करावा, संभाषण कौशल्य शिकावे या हेतुने भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्त निवास मध्ये चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
दि. ३ ते १२ मे या कालावधीत आयोजित केलेल्या निवासी अध्यात्मिक बाल संस्कार शिबिरात गणेश महाराज चौधरी,
शंकर महाराज सुसे,कैलास महाराज राजगुरु,संगित अलंकार प्रकाशजी कातकडे, मृदंगमणी ऋषिकेश महाराज फंटागरे,अंकुश महाराज कादे, कृष्णा महाराज सुसे, योगशिक्षक सुनिल दगडे
हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
शिबिरात विविध कौशल्य, योग प्राणायाम, श्रीमद् भगवद्गीता, ध्यान धारणा,हरिपाठ, आहार,वारकरी पाऊली, क्रीडा,शास्त्रीय गायन,अभिनय मृदुंग वादन,संभाषण कौशल्य,सकारात्मक विचार प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.या शिबिरात
२५ मुली व ४५ मुले असे एकूण ७० विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.

*गणेश महाराज चौधरी…*

उद्याची भावी पिढी संस्कृत,अध्यात्मिक विचारसरणी असलेली कौटुंबिक पारिवारिक व सामाजिक भान असलेली असावी या शुद्ध हेतूने तसेच दैनंदिन जीवन जगत असताना स्पर्धेच्या युगामध्ये तणावमुक्त जीवन जगण्याकरता आध्यात्मिक विचार सरणीची व विचार प्रवाहाची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी या सकारात्मक विचारांची ऊर्जेची व संत विचार प्रवाहामध्ये जीवन जगण्याची आवश्यकता आहे. नव्या तरुण पिढीला बाह्य जगातील झगमगत्या युगा पलीकडे वास्तविक जीवनाचे विवेक संपन्न ज्ञान असावे म्हणून अध्यात्मिक संस्कार शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे. या शुद्ध हेतूने आपण हे संस्कार शिबिराचे आयोजन नागेबाबा परिवार श्रीराम सेवा मंडळ व संपूर्ण आध्यात्मिक विचारसरणीच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने केले आहे. यामध्ये नागेबाबा भक्त निवास यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
-गणेश महाराज चौधरी
शिबिर आयोजक

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!